जालना येथिल घटनेच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेनेच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी
जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवासेना पदाधिकारी च्या वतीने नायब तहसीलदार राजेंद्र आहिरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील आशय असा की, जालना येथे मराठा आंदोलकांवर विनाकारण अमानुषपणे लाठीचार्ज करुन समस्त राज्यातील मराठा बांधवांच्या भावना दुखवण्याचे काम या पोलीस विभागाद्वारे करण्यात असून तरी त्या संदर्भात पोलीस विभागाकडून कुठल्याही प्रकराचा माफीनामा किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तरी शिवसेना युवासेना (शिंदे गट) भडगाव तालुक्याच्या वतीने सदर घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे व संबंधीत आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
निवेदनावर शहर प्रमुख अजय चौधरी, कुणबी मराठा समाज अध्यक्ष डॉ. विलास पाटील, विजयकुमार भोसले, युवा जिल्हाउपधिकारी निलेश पाटील, राजेंद्र आहिरे, तालुका संघटक स्वप्नील पाटील, युवा सेना तालुका अध्यक्ष दुर्गेश वाघ, प्रदीप महाजन, सौरभ पाटील, गणेश नरवाडे, रवींद्र पाटील, प्रशांत सोनार, राहूल तहसीलदार,किशोर पाटील, विनोद मोरे, अरुण नरवडे, संजय पाटील, नागेश वाघ, समाधान कोळी, चंद्रकांत वाघ, मयूर महाजन, सुरेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम