नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयात जोरदार राडा ; दोन्ही गट आमने-सामने !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ ।  अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्र्वादी कॉंग्रेस पार्टीत उभी फूट पडली आहे. दरम्यान, काल नाशिक शहरातील राष्ट्रवादी कार्यालय ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने आले. कार्यकर्ते आमनेसामने आले असून जोरदार राडा सुरू झाला. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये आता अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी समोर आले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांना मानणारा कार्यकर्ता त्यांचा समोर उपस्थित आहे. तर सकाळी देखील अशीच घटना घडली होती.

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. नाशिकमध्येही छगन भुजबळ व अजित पवार यांच्या समर्थकांचा एक गट व शरद पवा यांच्या समर्थकांचा एकत्र गट असे दोन गट पडले आहेत. दरम्यान, दोन्ही गटात चांगलाच राडा सुरू झाला आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. जोरदार घोषणाबाजी करत आहे. दरम्यान, छगन भुजबळ व अजित पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बॅनरबाजी करून कार्यालयाचा ताबा घेतला. त्यावरून दोन्ही गटात चांगलीच झुंपली आहे. महाराष्ट्रात कोठेही नाही असा अभूतपूर्व गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शरद पवारांचे फोटो असलेले होर्डिंग कार्यकर्त्यांनी गळ्यात घालून कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरूवात केली.

राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांना बैठक घेण्यापासून व कार्यालयात जाण्यापासून रोखले. त्यामुळे जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम