बंडखोरांनी शरद पवारांचाच घात केला ; आव्हाडांची जोरदार टीका

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी आता टीकेला सुरुवात केली आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी देखील जोरदार टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, बंडखोरांनी शरद पवार यांना चर्चा करू असे सांगितले. जसे अफजल खानाने शिवाजी महाराजांना या भेटू चर्चा कुरू असे सांगितले आणि घात केला तसा बंडखोरांनी शरद पवार यांचा घात केला, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. दरम्यान पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, दिलीप बनकर या आमदारांनी शरद पवार यांचे वय झाले आहे. त्यांना सोडा आपण भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करु असे म्हटले होते. त्यावळी जयंत पाटील हे सर्व ऐकूण रडले होते. शरद पवार यांना या वयात एकटे कसे सोडणार असे मी जयंत पाटलांना म्हटलो होतो. अजित पवार यांच्या आदरयुक्त भीतीने त्यावर सह्या केल्या होत्या.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजपबरोबर जाण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे होता. शिंदेंनी बंड केल्यानंतर 24 तासात राष्ट्रवादीकडून आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र तयार केले होते. अजित पवारांनी सांगितले म्हणून आमदारांनी त्यावर सही केली होती. यामध्ये मी देखील सही केली होती. पण पवार साहेबांना एकटे कसे सोडायचे म्हणून जयंत पाटीलांनी पत्र दिले नाही.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, पण याला विरोध करणारा पहिला आमदार प्राजक्त तनपुरे होता तो म्हणाला होता हे योग्य नाही.ज्या बैठकीत पत्रावर सह्या घेतल्या गेल्या. त्या बैठकीत आमदार दिलीप बनकरांनी भूमिका मांडली होती की पवारसाहेबांचे वय झाले आहे, त्यांना राहू द्या आपण भाजपला पाठिंबा देऊयात, याला जयंत पाटील यांनी विरोध केला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मविआचे सरकार असताना शिंदेंचे बंड होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना माहिती असणार. त्यांना पहिल्या 15 मिनिटांत याची माहिती मिळाली असणार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम