महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात : दोन जागीच ठार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३

गेल्या काही वर्षापासून राज्यातील समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापडा बनला असून नेहमीच या महामार्गावर अपघात होत आहे. तर नुकतेच समृद्धी महामार्गावर मेहकरनजिक खाजगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नागपूरच्या दिशेने गणराज ट्रॅव्हल्सची बस जात होती. सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास मेहेकरनजिक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला. तर बस मधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 37 प्रवाशी प्रवास करत होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम