पुण्यात प्रसिद्ध सराफा व्यवसायकावर गोळीबार

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३

गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ होत असतांना यात पुणे शहरात देखील वाढती गुन्हेगारीकडे पोलीस विभाग लक्ष ठेवून आहे. दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यवसायावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर भर रस्त्यात गोळीबार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यामधील वानवडी भागातील बीटी कवडी रोड जवळ ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये सराफा व्यवसाय गंभीर जखमी झाला आहे. त्याचबरोबर गोळीबार करणाऱ्यांनी व्यवसायिकाकडील सोन लुटून नेल्याची देखील माहिती मिळत आहे. सध्या या गोळीबाराच्या घटनेनंतर तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि अधिकचा तपास सुरू केला आहे. दरम्यान हा गोळीबार नेमका कोणी केला? कोणत्या कारणावरून करण्यात आला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाल्यामुळे पुणे शहर हादरले आहे. माहितीनुसार गोळीबार करून हल्लेखोरांनी कोट्यावधी रुपयांचे सोने लुटले आहे. हल्लेखोरांनी पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याचे देखील बोलले जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम