पुण्यातील साळुंके विहाराला भीषण आग ; चारचाकीसह दुचाकीचे मोठे नुकसान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ ।  पुण्यातील सांळुके विहार परिसरात आज शनिवारी दि. १५ जुलै रोजी मोठी आग लागल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड (एमएनजीएल)च्या गॅस पाईपलाईनला नाला पार्क जवळील साळुंके विहार येथे भीषण लागली. आग अत्यंत वेगाने पसरल्याने परिसरातील नागरिक आणि येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

आग लागल्याचे समजताच एमजीएनलची एक तुकडी आणि अग्निशामक दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्मिशामक दलाच्या पाच गाड्या आणि २ पाण्याचे टॅंकर आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती १२च्या सुमारास मिळाली, असे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गॅस पाईपलाईनला लागलेल्या आगीची दाहकता इतकी होती की त्या परिसरातील गाड्या आगीमुळे गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले. याआगीमुळे आजुबाजूच्या परिसरात धोका निर्माण झाला होता, त्यामुळे अग्मिशामक दल तत्परतेने घटनास्थळी दाखल झालं. मात्र, आग अद्याप नियंत्रणात येऊ शकली नाही. या परिसरात आग लागल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून, खबरदारी म्हणून सांळुके विहार परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम