त्यांच्या पोटात दुखल्यास डॉ.शिंदे आले आहेत ; देवेद्र फडणवीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जुलै २०२३ ।  राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यामाध्यामातून अनेक दिवसापासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात असून धुळे जिल्ह्यातील शासन आपल्या दारी उपक्रमापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली असून ते सुद्धा आता या कार्यक्रमात सहभागी होत आहे. त्यामुळे आजचा शासन आपल्या दारी हा उपक्रम आज नाशिक जिल्ह्यात सुरु आहे. यावेळी फडणवीस यांनी थेट विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. शासकीय कामांवर विरोधकांकडून टीका केल्या जात आहेत. त्यांचा चांगली काम केलंलं रुचत नाही. त्यांच्या पोटात दुखायला लागतं, त्यामुळं त्यांची पोटदुखी घालवण्यासाठी आम्ही डॉ. एकनाथ शिदेंना आणलं आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. नाशिक इथं ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

“कधीकधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं, लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखतं, तरी काही लोक यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मग शासन आपल्यादारी कशा करता? लोकं जमा करता कशा करता? अरे लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात. तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय?, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांना सवाल विचारला आहे.
तसेच आता चिंता करु नका कोणाच्याही पोटात दुखलं तरी त्या पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आम्ही आणले आहेत. त्यांच्या पचनी पडलं नाही तरी अजितदादा आहेत. त्यामुळं आता सर्वांच्या पोटदुखीवर आपण उपचार करणार आहोत. सामान्य माणसाला त्याचा अधिकारही देणार आहोत, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.मागं अजित पवार म्हणाले होते की, दोनच झेंडे दिसत आहेत पण आता तिसरा झेंडापण आला आता काळजी करु नका. आपल्याला तिनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशात सर्वात वर न्यायचा आहे. माझा महाराष्ट्रात देशात पहिल्या क्रमांकावर असेल हे आम्हाला करुन दाखवायचं आहे. त्यामुळं आम्हाला हा इतका मोठा प्रतिसाद मिळतो आहे, असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम