भारत जोडो यात्रेत तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  देशभरात सुरु असलेली भारत जोडो यात्रेचे नेतृत्व राहुल गांधींच्या खांद्यावर असतांना कोटा येथील सूर्यमुखी हनुमान मंदिरापासून यात्रा सकाळी 6.15 वाजता सुरू झाली. आज सकाळपासूनच यात्रा मार्गावर मोठी गर्दी झाली आहे. शहरातील अनंतपुरा भागात अचानक मोठी गर्दी झाली, तेव्हा लोक राहुल गांधींचा सुरक्षा कडे तोडून त्यांच्याजवळ पोहोचले. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ दोरीचा वापर करून लोकांना रोखले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी कोचिंगसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही भेट घेतली. त्यांनी मुलांना सांगितले की तुम्ही देशाचे भविष्य आहात…लव्ह यू. कोटा येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र, लोकांनी त्याला वाचवले. आज सकाळपासून भारत जोडो यात्रेने सुमारे 10 किलोमीटरचे अंतर कापले. यानंतर यात्रेने कोटा विमानतळासमोर टी-ब्रेक घेतला. दरम्यान, कोटा येथील यात्रेदरम्यान जमलेली गर्दी ही राजस्थान सरकारच्या शक्तिशाली मंत्री शांती धारीवाल यांच्या ताकदीचे प्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. धारिवाल हे कोटा येथीलच आमदार आहेत आणि ते गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यांपैकी आहेत.भारत जोडो यात्रेत आज जेवणाचा ब्रेक नसून आजची यात्रा सकाळी 11.30 वाजता संपणार आहे. कोटा जिल्ह्यातील प्रवासाचे वेळापत्रक बदल करून कमी करण्यात आले आहे.

ही यात्रा आज मिळून 24 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. आज भदाणा येथे यात्रेचा शेवटचा मुक्काम असेल. बुंदी जिल्ह्यातील केशोराईपाटन येथे राहुल गांधींच्या यात्रेसाठी कॅम्प लावण्यात आला असून तेथे दोन दिवस रात्रीचा मुक्काम असणार आहे. आजच्या भेटीनंतर राहुल गांधी रणथंबोरमध्ये सोनिया गांधींना भेटायला जाऊ शकतात. त्याचवेळी कोटा येथील यात्रेचे वेळापत्रक बदलल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. याआधी बुधवारी सचिन पायलट यांचे पोस्टर-बॅनर हटवण्यावरून येथेही राजकीय तणावाचे वातावरण पाहायला मिळाले होते. मात्र, कार्यक्रमातील बदलाबाबत जयराम रमेश यांनी असे बदल सामान्य असल्याचे म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम