जिल्हा कुस्ती स्पर्धेत हसन निजाम अली विजयी … राज्य स्पर्धेत निवड….

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख) महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद मान्यतेने जिल्हास्तरीय सामन्यात 92 किलो गटात गादी विभागात हसन निजाम अली हसन अली सय्यद हा विजयी झाला त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली त्याचे कौतुक जिल्हाभरातून अनेक मान्यवरांनी केले आहे तो खेळाडू हाजी शब्बीर पैलवान यांच्या पुतण्या व हसन पैलवान यांच्या चिरंजीव आहे अमळनेरचे आमदार दादासो अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषी भूषण साहेबराव दादा पाटील व स्मिताताई वाघ माजी आमदार चाळीसगाव राजू दादा देशमुख सुनील भाऊ देशमुख अमळनेर तालीम संघ अमळनेर तालुका परिषदेच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळू पाटील व संजय कौतिक पाटील प्रताप आबा शिंपी रावसाहेब पैलवान संजय बिला पाटील विनोद निकम योगेंद्र बाविस्कर भरत पवार आबा शिंदे यांनी अभिनंदन केले हा निजाम अली भविष्यात महाराष्ट्र केसरी असू शकतो अमळनेरच्या मातीतला पैलवान हा मोठा झाला पाहिजे यासाठी अमळनेर कुस्ती संघ नेहमी सोबत राहील असेच मल्ल अमळनेर नगरीत तयार व्हावेत आशी भावना व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम