किरकोळ वादातून युवकावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I पुण्यातील कोथरुड भागात किरकोळ वादातून युवकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यश कालीदास जगताप (वय 18, रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
या प्रकरणी सचिन शंकर कदम (वय 23), प्रवीण शंकर कदम (वय 29 दोघे रा. साईनाथ वसाहत, कोथरुड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सचिन आणि प्रवीण हे यशच्या ओळखीचे आहेत. रात्री अकराच्या सुमारास यश मित्रांबरोबर साईनाथ वसाहतीत गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपींनी यशला शिवीगाळ करुन त्याच्यावर कोयत्याने वार केले. किरकोळ वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम