तीन वर्षात जवळपास 500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला लावणारा अमळनेर एकमेव मतदारसंघ..

बातमी शेअर करा...

-आ.अनिल पाटील यांचा पत्रकार परिषदेत दावा,40 गावांचा अतिवृष्टीचा पैसा मोकळा केल्याने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार..

अमळनेर(प्रतिनिधी)मागील अडीच ते तीन वर्षात अतिवृष्टी, पिकविमा,शेतकरी कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांच्या विविध योजनांतून कोणतीही मदत असेल यासाठी जवळपास 500 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला लावणारा अमळनेर मतदारसंघ एकमेव असून विकास कामा व्यक्तिरिक्त आपण केलेले हे मोठे काम आहे असा खुलासा आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत करत.तालुक्यातील 40 गावातील अतिवृष्टीचा पैसा जी आर काढून मोकळा केल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.

तालुक्यात सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या 40 गावातील अतिवृष्टीचा पैसा मिळविण्यासाठी शासन दरबारी प्रचंड खटाटोप त्यांनी केला असताना गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी शासनाकडून पैसे वितरित करण्याचा जी आर निघाल्याने यासंदर्भात त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा प्रवास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन त्यांनी केले होते,यावेळी पाठपुराव्याचे अनेक पुरावे सादर करत आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की अमळनेर तालुक्यात सप्टेंबर 2019 मध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली त्यावेळी राज्यात भाजप-सेना युतीचे शासन होते,40 गावांच्या शेतकरी बंधूंना याचा मोठा फटका बसून मोठे नुकसान त्यांचे झाले ,असे असताना यंत्रणेचे आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याने वेळेवर पंचनामे झाले नाहीत ,यामुळे शासनाकडे प्रस्ताव पोहोचण्यास विलंब झाला,त्यानंतर मी आमदार झाल्यानंतर सर्वात आधी या विषयाकडे लक्ष केंद्रित केले,तहसीलदार, विमा कम्पनी आणि कृषी विभाग यांची एकत्रित बैठक घेऊन प्रस्ताव तयार करायला सांगितला विभागीय आयुक्तांकडून प्राप्त प्रस्तावालाच मान्यता मिळत असल्याने त्यात वेळ गेला ,त्यानंतर कोविड कालावधी मुळे कार्यालयीन कामकाजावर बंधन आल्याने त्यातही वेळ गेला,प्रस्ताव शासन दरबारी पोहोचल्यावर तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री ना वडेट्टीवार यांच्याकडे मान्यतेसाठी आग्रह धरला, नंतर कोकणात अतिवृष्टी झाल्याने याला पुन्हा ब्रेक मिळाला,दरम्यानच्या काळात अमळनेर तालुक्यासह राज्यातील अतिवृष्टीचे पैसे महाविकास आघाडी शासनाने दिले हिते मात्र सप्टेंबर 2019 चे अतिवृष्टीचे पैसे देण्यासाठी तब्बल 1800 कोटी लागणार असल्याने हा विषय प्रलंबित राहिला होता,सततच्या पाठपुराव्यामुळे हाय पॉवर कमिटी आणि उपसमिती ने प्रस्तावास हिरवा कंदील दिला,नंतर या 40 गावांच्या पैश्यांसाठी माझा आग्रह लक्षात घेता तत्कालीन उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी सर्व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलावत या प्रस्तावास मान्यता दिली,मान्यता झाली पैसेही वितरित करण्याचे आदेश झालेत मात्र दुर्देवाने महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले.
नवीन सरकार स्थापन होण्याआधी मंत्रालयातील सचिव कोणते निर्णय घ्यायला तयार नव्हते,तिन्ही विभागाच्या सचिवांची मी भेट घेऊन मान्यता असल्याने पैसा मोकळा करण्याचा आग्रह धरला,परंतु जी आर काढण्यासाठी मंत्रीमहोदय आवश्यक असल्याने सरकार स्थापन होण्याची वाट पहावी लागली,शिंदे सरकार विराजमान झाल्यानंतर मदत पुनर्वसन हे खाते मुख्यमंत्री महोदयांकडेच असल्याने मी विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांना सांगून शिष्टमंडळासह मुख्यमंत्री त्यानंतर उपमुख्यमंत्री यांची भेट घेत निवेदन दिले, राज्यपालांचीही आम्ही भेट घेऊन निवेदन दिले, त्यानंतर या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवून जी आर काढण्याची जोरदार मागणी वजा विनंती केली,यादरम्यान विरोधीपक्ष नेते ना अजितदादा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले,आणि याचेच फलित म्हणून गणेशोत्सवाच्या अगमनापूर्वी जि आर काढला गेला आहे,यात अमळनेर तालुक्यातील 40 गावातील 13,103 हेक्टर जमिनीवरील पिकांच्या नुकसानभरपाई साठी 35कोटी मदत शासनाने दिली असून हे पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार असल्याचे त्यांनी सांगत मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे मतदारसंघाच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले. आणि हे पैसे मिळणार हे माहीत झाल्यावर केवळ श्रेयासाठी कुणी पत्र दिल्यावर श्रेय कधीच मिळत नसते असे त्यांनी आवर्जून सांगितले.

धरणाचा केंद्राच्या पीएमकेएस वाय योजनेत समावेशासाठी प्रयत्न

याबाबत सांगताना आ पाटील म्हणाले की या अधिवेशनात 80 कोटीची थांबविलेली विकास कामे,ज्यात महसूलची इमारत तलाठी कार्यालय,रस्त्यांचा समावेश आहे याकडे शासनाचे लक्ष आपण वेधले आहे,मात्र कमी दिवसाच्या कालावधीमुळे पाडळसरे धरणाची लक्षवेशी लागु शकली नाही पण नागपूर अधिवेशनात ती नक्की गाजणार आहे,प्रत्यक्षात केंद्राच्या पीएमके एसवाय योजनेत धरणाचा समावेश होण्यासाठी केंद्राकडे आपण आग्रह धरला आहे,खा शरदचंद्र पवार यांनीही यासाठी मोलाची मदत केली आहे,केंद्रीय सचिवांशी मिटिंग देखील आहे,नवीन सुधारीत मान्यता आवश्यक असल्याने सुप्रमा साठी आपले प्रयत्न आहेत, आपले खासदार पण यासाठी मदत करताहेत,धरणाच्या कामात कोणतेही राजकारण करायचे नाही हे ध्येय असल्याने प्रत्येकाची भेट आपण घेत आहोत,सुप्रमा झाल्यावर साधारणपणे 5000 कोटीच्या आसपास धरणाचा बजेट जाईल,योग्य वाटचाल राहिल्यास येत्या मार्च पर्यंत धरणाचा पी एम के एस वाय मध्ये समावेश होईल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.

अमळनेर गांवातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे पैसे | Dainik Batmidar
https://youtu.be/B-SbAmI-b4g

अनेक लहान बंधाऱ्यांची निर्मिती,,

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की पाडळसरे धरण वगळता गावोगावी छोटे बंधारे निर्माण करण्यास 1800 कोटी मिळाल्याने अनेक बंधारे पूर्णत्वास आले आहेत,अजूनही काहींचे काम सुरू आहे,याव्यतिरिक्त पाणीपुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या अनमोल सहकार्याने मतदारसंघात तब्बल 90 गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मिळाल्या असून येणाऱ्या काळात त्या पूर्ण झालेल्या असतील असे सांगत सत्तेचा काळ गेला आता विरोधी आमदार असलो तरी आपली आक्रमकता या अधिवेशनात जनतेने प्रत्यक्ष पहिली असून पाहिजे तेवढा निधी खेचूनच आणणार असा दावा आमदारांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम