लोणचारम येथे 65 लक्षच्या पाणीपुरवठा योजनेचे आमदार अनिल पाटलांच्या हस्ते भूमीपूजन.. विविध विकास कामांचाही समावेश..

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेला विकास कामांचे भूमीपूजन आणि लोकार्पण चा रथ अजूनही सुरूच असून लोणचारम येथे नुकतेच 65.53 लक्षच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसह इतर विकास कामांचे भूमीपूजन आ.अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर गावात असणारी पाणीटंचाई लक्षात घेता आमदारांनी जलजीवन मिशन अंतर्गत 65 लक्षची नवीन योजना गावासाठी मंजूर केल्याने हि योजना पूर्णत्वास आल्यानंतर निश्चितपणे पाणीटंचाई वर मात करणे शक्य होणार आहे.सदर कामाच्या भूमीपूजन साठी आमदारांचे गावात आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले,यावेळी पाणीपुरवठा योजनेसह 15 लक्ष निधीतुन आमदार निधीतून सभामंडप आणि 2515 अंतर्गत 15 लक्ष निधीतून स्मशानभूमी कामाचेही भूमीपूजन यावेळी करण्यात आले असे एकूण 95.53 लक्ष च्या कामांचे भूमीपूजन यावेळी झाले.आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतात विकास कामांचा आढावा मांडला.
यावेळी कामगार नेते एल टी पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव नाना पाटील, मंदाकिनी अनिल पाटील (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस), सीमा विवेक पाटील (सरपंच तथा जिल्हा सरचिटणीस महिला काँग्रेस जळगाव) ग्रा.पं.सदस्य सरिता निंबा पाटील, देवकाबाई संभाजी पवार, काशिनाथ पाटील, अशोक पाटील, प्रदीप प्रतापराव पाटील, सुरेश पितांबर पाटील, रवींद्र वैद्य, निंबा ताराचंद पाटील (चेअरमन विकासो), वसंत शंकर पाटील, सुनिल गुलाबराव पाटील (उपसरपंच- लोणसिम) जगन ओंकार पाटील, संजय थोरात, विश्वास बाजीराव पाटील (मा.सरपंच लोणसिम) सुशील शिंदे, यशवंत पाटील, संजय पाटील, संदीप पाटील, मधुकर पाटील, किशोर पाटील, शालिक पाटील, शिवाजी पाटील, अनिल पाटील सर, मधुकर पाटील, मालोजी पाटील, गोरख पाटील, सुनील राठोड, विवेक पतींगराव पाटील (तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी) यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम