आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झाली लाडू तुला आमदारांवर शुभेच्छांचा पडला पाऊस,कुठे झाले आरोग्य शिबीर, कुठे वृक्षारोपण, कुठे अन्नदान तर कुठे फळ वाटप

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदार संघाचे भूमिपुत्र आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांचा वाढदिवस यंदा मोठ्या थाटात साजरा झाला,दिवसभरात सर्वपक्षीय मान्यवर सर्व स्तरातील नागरिक, हितचिंतक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांनी शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडला.दिवसभरात कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रमही पार पडले.
यंदाच्या वाढदिवसाला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या वतीने सायंकाळी आमदारांची लाडूतुला करून सदरचे लाडू सर्वाना वाटण्यात आले.काल सकाळपासूनच आमदारांच्या निवासस्थानी शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली असल्याने या परिसराला दिवसभर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते,रात्री उशीरापर्यंत गर्दीचा प्रवाह सुरूच होता,वाढदिवसाच्या निमित्ताने अनेकांनी सामाजिक व लोक हिताचे उपक्रम आयोजित केले होते यात सकाळी आरोग्य शिबिरात अनेकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली,या शिबिरातमधुमेह तपासणी व रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी व निदान,SPO2 तपासणी,हृदयरोग तपासणी व निदान,श्वसन रोग तपासणी,Echocordiogram ECG तपासणी करण्यात आली अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला,सदर शिबिराचे आयोजन गौतम पाटील, वरूण पाटील, धीरज पाटील, तेजस पाटील, सौरव पाटील, किरण माळी, राहुल गोत्राळ व आमदार अनिल भाईदास पाटील मित्र परिवाराने केले होते,त्यानंतर वेले ता.चोपडा येथील बेवारस मनोरुग्ण कल्याण आश्रमात अन्नदान कार्यक्रम पार पडला,अमळनेर ग्रामिण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले याशिवाय विविध ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले.
तसेच दिवसभरात विविध ठिकाणी आमदारांना आमंत्रित करून वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार केक देखील कापण्यात आलेत आमदारांच्या वाढदिवसानिमित्त राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेते मंडळी तसेच जिल्हाभरातील नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकारी आदींनी भ्रमणध्वनी द्वारे आमदारांना शुभेच्छा दिल्या तर जिल्हाभरातील अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अमळनेरात येऊन आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आमदारांच्या वाढदिवसानिमित्त हितचिंतक व कार्यकर्ते आणि समाज बांधवांच्या शुभेच्छांचे फलक संपूर्ण शहर झळकत होते.विशेष करून महाविकास आघाडीतील घटक पक्ष्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवसभर आमदारांच्या निवासस्थानी दिसून आल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असले तरी महाविकास आघाडीची एकजूट घट्ट असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम