
रेल्वेच्या मुंबई ते दिल्ली बुलेट रॅलीची मंगळग्रह मंदिराला भेट
अमळनेर(प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जनजागृती करण्यासाठी संपूर्ण भारतभर भारतीय रेल्वे द्वारे बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.रॅलीतील सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजनचे कर्मचारी वेस्टर्न रेल्वे डिव्हिजन भरूच येथे मार्गस्थ झाले होते. २५ जणांच्या बुलेट रायडर्स ग्रुपने येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरास भेट दिली .या वेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी मंदिरा विषयी माहिती देऊन सर्वांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे सेवेकरी मनोहर तायडे , मेजर राजेंद्र यादव व आर.पी.एफ.चे उपनिरीक्षक एन.के.यादव व जी. एस. वर्मा (मुंबई),सहाय्यक उपनिरीक्षक कुलभूषणसिंग चव्हाण, राकेश पाटील व दिनेश मांडळकर उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम