“आप” यांनी साजरा केला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा वाढ़दिवस

आप औरंगाबाद च्या वतीने मा. अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 17 ऑगस्ट 2022 | औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वात तथा मार्गदर्शनाने अरविंद केजरीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वप्रथम सकाळी अकरा वाजता जय भवानी नगर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर लावण्यात आले होते सकाळी अकरा वाजल्या पासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरास भेट देऊन स्वतःच्या मोफत तपासण्या करून घेतल्या, व सर्व रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत औषध उपचाराचे योग्य सल्ला देण्यात आला, त्यानंतर दुपारी एक वाजता औरंगाबाद घाटी रुग्णालय येथे रुग्णास रुग्णाच्या नातेवाईकास अल्पोपहार म्हणून खिचडीचे वाटप करण्यात आले, तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आरोग्य सल्ला देखील देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्याचा लाभ घेतला, त्यानंतर सायंकाळी चार वाजता नक्षत्र वाडी येथील मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी आश्रमातील वृद्धांना फळांचे वाटप करून अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस सर्व वृद्ध नागरिकांसोबत साजरा करण्यात आला, व शेवटी संध्याकाळी सहा वाजता सिडको येथील नेहरू उद्यानात विविध वृक्षरोपणाच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यान्ना सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

सदरील कार्यक्रमाचे आयोजन रघुनाथ दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वात केले गेले. याप्रसंगी प्रामुख्याने मराठवाडा विभागीय सदस्य सदाशिव पाटील, जिल्हा सचिव संजय नागरे, प्रचार समिती जनसंपर्कप्रमुख प्रवीण हिवाळे, जनसंपर्कप्रमुख बशीर भाई, उपाध्यक्ष वैजनाथ राठोड, उपाध्यक्ष सुनील भालेराव, उपाध्यक्ष मेघाताई राईकवार, लोडिंग रिक्षा समिती प्रमुख ख्वाजा किसमत वाला, नासिर खातिब , उप संपर्कप्रमुख कलीम पटेल, फुलंब्री तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, कन्नड तालुका अध्यक्ष सुभाष निकम, युवा जिल्हाध्यक्ष आशिष शिसोदे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अतुल निकम, युवा शहराध्यक्ष अभिषेक सात्रळकर, युवा शहर सचिव दीपक ढगे, डॉक्टर रेगे, इम्रान बिल्डर, किशोर फुलवारे, सुदर्शन बारवाल, ऋग्वेद राईकवार, राष्ट्रपाल गवई, सतीश घुनघाव, देविदास लहाने, अमजद सय्यद, वॉर्ड अध्यक्ष संगीता फुसे, वॉर्ड उपाध्यक्ष मनीषा साळवे, वंदना साठे, वॉर्ड अध्यक्ष प्रवीण पालवे, डॉक्टर अविनाश गायकवाड, चार्टर अकाउंटंट विशाल पारखे, डॉक्टर सुमित कांबळे, डॉक्टर अक्षय शिक्रे, डॉक्टर प्रमोद वागलकर, इंजिनीयर किरण नरवडे, डॉक्टर रोहन चौरे, डॉक्टर शहाजी बिराजदार, मातोश्री वृद्धाश्रमाचे एडवोकेट ललित जोशी मॅनेजर सागर पागोरे आरोग्य सेवक अनिल साळवे व विकास खंदारे, धर्मराज पाटील, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा अध्यक्ष तथा शहर कार्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांना अरविंद केजरीवाल यांना सर्वांचे वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या, व त्यांच्या कार्याचा गौरव करताना असेच समाज उपयोगी कार्यक्रम आपण वर्षभर घेत चला असे आवाहन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम