MTS परीक्षेत आरुषी लहुसिंग राजपूत महाराष्ट्र राज्यात १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

बातमी शेअर करा...

प्रतिनिधी | भडगाव :-

महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) परीक्षेत वडधे येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आरुषी लहुसिंग राजपूत ही राज्यात 15 व्या क्रमांकाने तर केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. ही परीक्षा तालुका प्रतिनिधी श्री सागर विलास महाजन यांच्या मार्फत राबविण्यात आली होती. आरुषी राजपूत ला मार्गदर्शक म्हणून पूजा अवधूत कासार यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
आरुषी हीचे वडील खानावळ हॉटेल चालवितात. तिच्या या यशाने सर्व कुटुंब आनंदी झाले असून नातलग, परिसरातील नागरिक,मान्यवर, शिक्षक आदींनी तिला शुभेच्छा देत कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम