कार्यकर्ते संभ्रमात ; शरद पवारांचे घुमजाव !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार |   २५ ऑगस्ट २०२३ राज्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले शरद पवार यांनी आज सकाळी अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते असल्याचे वक्तव्य केले आता दुपारी मात्र, घुमजाव केले. मी तसे बोललेलो नाही तर सुप्रिया सुळे तशा म्हणाल्या असल्याचे शरद पवार यांनी दुपारी सांगितले. सकाळी अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले शरद पवार यांचे वक्तव्य राज्यभर चर्चेचा विषय झाला होता. मात्र, आपल्याच वक्तव्यावर दुपारी शरद पवारांनी घुमजाव केले. त्यामुळे कायम संभ्रम ठेवणाऱ्या शरद पवारांच्या भुमिकेवरील संभ्रम आणखीनच वाढला आहे.

माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी दोन्ही वक्तव्य केले आहेत. त्यामुळे हा संभ्रम आणखीनच वाढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नाही. तसेच अजित पवार हे आमचे नेते असल्याचे म्हणालो नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. पक्षातील काही लोकांनी दुसरी भूमिका घेतली, त्यांनी पक्ष सोडला तर त्याला पक्षात फूट पडली असे म्हणता येत नाही. असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. ज्याना जायचे होते, त्यांनी नवीन मार्ग स्वीकारला असेल, तर त्याला फूट पडली असे म्हणता येत नसल्याचेही ते म्हणाले.

सुप्रिया सुळे, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, त्यात काही वादच नाही. फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते, जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला तर, आज तशी स्थिती येथे नाही. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यावरुन अनेक राजकीय अर्थ काढले जात होते. पहाटेच्या शपथ विधी नंतर एकदा संधी दिली होती. आता त्यांनी संधी मागायची नाही तर आम्ही देखील त्यांना संधी द्यायची नाही, अशी आमची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. आता त्यांना संधी द्यायची नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम