अभिजीत बिचुकले निवडणुकीत मिळाले इतके मते !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ मार्च २०२३ । नेहमीच आपल्या वक्तव्याने राज्यातील जनतेला भरभरून हसविणारे व नुकतेच कसबा पोटनिवडणुकीत आपले नशीब अजमावू पाहणारे आणि विजयाचा दावा करणारे एक उमेदवारे म्हणजे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे सुरवातीपासून चर्चेत होते. सहाव्या फेरी अखेर अभिजीत बिचुकले यांना फक्त बोटावर मोजण्या इतकी मतं म्हणजे अवघी चार मतं मिळाली असून, सहाव्या फेरी अखेर त्यामध्ये सातत्य कायम आहे.

ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी विजयाचा दावा केला होता त्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत अवघी 12 मते मिळाली आहे. तर सहाव्या फेरी अखेर त्यांना 100 मतं मिळाली आहे. कसबा पोटनिवडणूक बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांच्यामुळे अधिकच चर्चेत आली आहे. मात्र, यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात खरी लढत पाहायला मिळत आहे. असून त्यामध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर आहे. रवींद्र धंगेकर यांना तिसऱ्या फेरीअखेर 11 हजार 157 मतं मिळाली असून हेमंत रासने यांना 10 हजार 673 मतं मिळाली आहेत.

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली तेव्हा ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी माझाच विजय होणार असल्याचा दावा केला होता. टिळक कुटुंबात उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याचे सांगत निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला होता. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही माझा विजय होईल. मी या मतदार संघात राहणारा असल्याचे सांगत जनता या राजकारण्यांना वैतागली असल्याची टीका करत माझा विजय होईल, असा दावा केला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी बिचुकले यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
बिचुकले आणि दवे यांना पहिल्या तीन फेरीपर्यन्त बोटावर मोजण्या इतकीच मतं मिळाली आहेत. त्यामुळे बिचुकले आणि दवे यांना किती मतं मिळाली यावर सोशल मिडियावर चर्चा होऊ लागली आहे. त्यामध्ये बिचुकले यांना आवगी चार मतं सहाव्या फेरीच्या अखेर पर्यन्त मिळाल्याने चर्चेचा विषय झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम