शिव ठाकरेने दिली गोड बातमी : जाणून घ्या काय आहे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ मार्च २०२३ । बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा १२ फेब्रुवारीला झाली तेव्हा एक नाव ऐकून सर्वांनाच धक्का बसला. प्रियंका चहर चौधरी किंवा शिव ठाकरे विजेते ठरतील असे चाहते गृहीत धरत होते. मात्र सलमान खानने एमसी स्टेनचे नाव घेताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, आता बिग बॉस’च्या या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर उपविजेता असलेला शिव ठाकरे याने आपल्या फॅन्सला एक गुड न्युज दिली आहे.

बिग बॉसमुळे शिव ठाकरेला अफाट लोकप्रियता मिळाली आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहते सतत शिवबाबत लहान-लहान गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आणि शिव देखील आपल्या लाडक्या चाहत्यांना नाराज करत नाही. आणि चाहत्यांच्या जास्तीत-जास्त संपर्कात राहण्यासाठी आता शिव ठाकरेने स्वतःच युट्युब चॅनेल सुरु केलं आहे. या चॅनलवर शिव आपल्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी आणि आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती चाहत्यांना देताना दिसणार आहे.

दरम्यान, शिव ठाकरेच हे नवीन चॅनेल सुरु होताच त्याला तब्बल 23 हजार लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. तसेच, येणाऱ्या काळात आपल्या या नवीन चॅनलला आणखी लोकांनी सबस्क्राईब करावं अशी ईच्छा शिव ठाकरेने बोलून दाखवली आहे. मराठमोळ्या शिवने ‘बिग बॉस हिंदी’मधील सदस्यांसह प्रेक्षकांची मनंही जिंकून घेतली आहे. टास्कविषयी असो, घरात होणार्‍या राड्यांविषयी असो वा सदस्यांच्या दिवसागणिक बदलणार्‍या नात्यांविषयीची असो. मराठमोळा शिव ठाकरे या यादीत नंबर वन राहिला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम