लाच मागितली अन चाहूल लागताच फरार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ ।  राज्यातील अनेक शासकीय विभागात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत जात आहे. नुकतेच बेलवंडी पोलीस ठाण्यातील दाखल‎ असलेल्या किरकोळ गुन्ह्यात मदत‎ करण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच‎ स्वीकारताना, लाचलुचपत प्रतिबंधक‎ विभागाच्या पथकाने एका पोलीस‎ कर्मचाऱ्यास पकडले. मात्र, पथकाची‎ चाहूल लागताच या कर्मचाऱ्याने पोलीस‎ ठाण्यातून धूम ठोकली.

ज्ञानेश्वर‎ रावसाहेब पठारे असे या पोलिस‎ कर्मचाऱ्याचे नाव आहे.‎ बेलवंडी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर‎ पठारे कार्यरत आहे. एका गुन्ह्यात जामीन‎ मिळवून देण्यात मदत करण्यासाठी त्याने‎ तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी‎ केली होती. याबाबत अहमदनगर‎ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे‎ संबंधिताने तक्रार केली. त्यानुसार‎ पथकाने बु‌धवारी (ता. २१) सायंकाळी ५‎ वाजेदरम्यान बेलवंडी पोलीस ठाण्यात‎ सापळा रचला.

पठारे याने पंचासमक्ष ४‎ हजार रुपये लाचेची मागणी केली. ही‎ रक्कम पंचासमक्ष पोलीस ठाण्यात‎ मागील खोलीतील कपाटात ठेवण्यास‎ सांगून स्वीकारली. मात्र, नंतर आपण‎ लाचेच्या जाळ्यात अडकल्याचे लक्षात‎ येताच, त्याने पोलीस ठाण्यातून पलायन‎ केले. पोलीस ठाण्यापासून काही‎ अंतरावर असलेल्या उसात तो लपून‎ बसला. लाचलुचपत पथकातील‎ अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला, पण‎ तो सापडला नाही. दरम्यान, बेलवंडी‎ पोलिस ठाण्यात पठारे याच्याविरुद्ध गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे.‎ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस‎ निरीक्षक गहिनीनाथ गमे, पोलीस‎ अमलदार कराड, महिला पोलीस नाईक‎ राधा खेमनर यांच्या पथकाने ही कारवाई‎ केली.‎

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम