शेतकरी आनंदी : मान्सून राज्यात दाखल पण…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जून २०२३ । राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्याना आनंदाची बातमी आहे. राज्यात आजपासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील नागपूरस मराठवाड्यातील नांदेड तथा मुंबई व आसपासच्या भागांत शुक्रवारी सकाळी रिमझिम पाऊस झाला. यामुळे उकाड्यामुळे हैरान झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

8 जून रोजी मान्सून केरळमध्ये धडकला होता. केरळात उशिराने मान्सून धडकल्याने महाराष्ट्रातही मान्सून लांबणार असल्याची चर्चा होती. मात्र 11 जून रोजी राज्यात मान्सूनने हजेरी लावली. मात्र पुन्हा पाऊस गायब झाला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून गेल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर हवामान विभागाने 23 जून रोजी मान्सून परतणार असल्याचे सांगितले होते.

राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत कायम आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. लवकर पाऊस न पडल्यास आहे ती पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिके वाया गेली आहेत. राज्यातील काही भागात उशिरा का होईना पण मान्सून दाखल झालेला आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार पावसाची अपेक्षा आहे. बळीराजा पेरणीसाठी अडकून पडला आहे. सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. आजपासून तरी वरुणराजा बरसावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळं मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होत आहे. पावसाने दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणीसाठा तळाला गेला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम