दै. बातमीदार I ५ डिसेंबर २०२२ I मुलगा झाला नाही, लग्नात मानपान दिला नाही आणि चरित्र्याचा संशय घेवून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी ४ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासून सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील अयोध्या नगरात माहेर असलेल्या ३३ वर्षीय विवाहिता यांचे दादर नगर हवेली येथील सासर आहे. त्यांचा २०१६ मध्ये विवाह झालेला आहे. त्यांना एक मुलगी आहे. दरम्यान, विवाहितेला मुलगी झाली, मुलगा झाला नाही तसेच शालकाच्या लग्नात मानपान दिला नाही. एवढेच नाही तर तिच्या चरित्र्याचा संशय घेत विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात सासू आणि सासरे यांनी देखील पाठराखन केली. या छळाला कंटाळून विवाहिता जळगावी माहेरी निघून आल्या. रविवारी ४ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम