एसीबीची जळगावात मोठी कारवाई : सुभेदारासह दोन महिला शिपाई लाच घेताना अटक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महसूलसह पोलीस विभागात लाच खोरीचे प्रमाण वाढत असतांना आज पुन्हा एकदा जळगावात धुळे एसीबीने कारवाई केली आहे. जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या मुलाला भेटण्यासाठीआलेल्या आईकडून २ हजारांचा लाच स्विकारतांना कारागृहातील सुभेदार भिमा उखडू भिल, महिला पोलिस शिपाई पूजा सोपान सोनवणे व हेमलता गयबू पाटील यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारच्या सुमारास झाली. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती.

तक्रारदार महिला पहूर येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा हा एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिला यांच्याकडून मुलाला भेटण्यासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात होती. तसेच भेटू न देण्याचे काम देखील सांगितले जात होते. मंगळवारी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहाजवळ आल्या होत्या. त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार भिमा भिल, महिला पोलिस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांच्यासह इतर जण होते. त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी महिलेकडून दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदार महिलेची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैसे देवू शकत नव्हती. त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या महिला कारागृह पोलिस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांनी सुभेदार भीमा उखडूं बिल यांच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून २ हजार रुपयांची लाच मागितली तर हेमलता पाटील यांना लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे यांनी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम