प्रत्येक जिल्हात राबविणार ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ !
बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३
समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मंत्रालयात मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमा’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दीपावली सण जवळ आला आहे. मुंबई उपनगरमध्ये नमो ११ कलमी कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आनंद होत आहे. शासनाच्या सर्व योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचतील, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. हेच लक्षात घेऊन राज्यात पंतप्रधान मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम