उल्टा चष्मामधील ‘त्या’ अभिनेत्रीचा अपघात ; युरोप दौरा अपूर्ण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२  नेहमी चर्चेत असलेले टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्या मालिकेतील कित्येक पात्रं ही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. त्यातच बबिता फेम मुनमुन दत्ताला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे.

मुनमुन ही गेल्या काही दिवसांपासून युरोपच्या दौऱ्यावर आहे. त्यात जर्मनीमध्ये असताना तिला अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तिनं चाहत्यांना काळजी न करु नका. आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. मला दुखापत झाल्यानं दौरा अर्धवट सोडावा लागत असल्याचे मुनमुननं म्हटले आहे.

Munmun Dutta

 

मुनमुनची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी आणि चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी तारक मेहतामध्ये जेठालाल यांचे वडील चंपक चाचाची भूमिका करणाऱ्या अमित भट्ट यांना देखील अपघात झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती.त्यानंतर आता मुनमुन दत्तानं दिलेल्या धक्कादायक बातमीनं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. चाहत्यांना देवाचा धावा सुरु केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम