काय सांगता ; श्रेयाच्या आवाजात बिघाड ‘ती’ पोस्ट व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ नोव्हेबर २०२२ आपल्या बहारदार गायनानं श्रेयानं चाहत्यांना जिंकून घेणारी बॉलीवूडची प्रसिद्घ गायिका श्रेया घोषालची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ घेतले आहे. श्रेया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. मात्र आता तिच्या त्या पोस्टनं लाखो चाहत्यांच्या काळजात धस्स झाले आहे. तिनचं केलेल्या खुलाशानंतर चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

 

श्रेयाच्या पोस्टमध्ये काय आहे…
श्रेयानं लिहिलं आहे की, गेल्या रात्री माझा ओरलँडोमध्ये नाईट कॉन्सर्ट होता. त्यानंतर अचानक माझ्या आवाजात बिघाड झाला. मला त्रास होऊ लागला. माझा आवाज हा त्या कॉन्सर्टनंतर गेलाच होता. त्यामुळे मी खूप घाबरुन देखील गेले होते. काय करावे मला कळेना. अशावेळी माझे चाहते आणि डॉक्टर समीर भार्गव यांनी घेतलेली काळजी यासगळ्यांना मी धन्यवाद देते.
श्रेयानं त्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्या कॉन्सर्टनंतर माझा आवाज हा खराब झाला आहे, ती पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली आहे. सध्या श्रेयाची प्रकृती आणि तिचा आवाज ठीक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अचानक एखाद्या लाईव्ह कॉन्सर्टनंतर आवाज जाणे हे एखाद्या कलाकारासाठी धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. त्यात श्रेयासारख्या गायकीच्या आवाजाला बसलेला धक्का हा चाहत्यांना आणखी काळजीत टाकणारा आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम