आरोपीला परदेशात जाण्यापासून रोखता येणार नाही ; दिल्ली उच्च न्यायालय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ नोव्हेबर २०२३

एखाद्या व्यक्तीच्या परदेश प्रवासासाठी दक्षता चौकशी अडथळा ठरू शकत नाही, असे स्पष्ट करत दिल्ली उच्च न्यायालयाने एका महिलेला मधुचंद्रासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिली.
ही महिला मायदेशी परत येणारच नाही, असा कोणताही धोका नाही. तसेच परदेशातून आल्यानंतर ती चौकशीसाठी उपलब्ध राहू शकते, असेही न्यायालय म्हणाले.

याचिकाकर्ती महिला सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणातील आरोपी आहे. जुलै महिन्यात तिला अटक करण्यात आली होती. सध्या ती जामिनावर आहे. जामीन देताना न्यायालयाने तिला तिचा पासपोर्ट जमा करण्यास सांगितला होता. या महिलेने न्यायालयात याचिका दाखल करत २९ नोव्हेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान मधुचंद्रासाठी परदेशात जाण्याकरिता परवानगी देण्याची विनंती केली होती. सीबीआयने ही परवानगी देण्यास विरोध दर्शवला होता. या महिलेवर गंभीर आर्थिक गुन्ह्याचे आरोप आहेत. तिची चौकशी सुरू असून तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद सीबीआयने केला होता. मात्र चौकशी सुरू आहे म्हणून परदेशात जाण्यापासून रोखता येणार नाही, असे हायकोर्टाने नमूद करत तिची याचिका मंजूर केली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम