
थिएटरमध्ये जो तमाशा व मारहाण केली म्हणून कारवाई ; फडणवीस
दै. बातमीदार । १२ नोव्हेबर २०२२ जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले कि, जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे. कुठल्याही गोष्टीचे उद्दातीकरण करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन थिएटरमध्ये जो तमाशा केला, मारहाण केली. त्यामुळे कारवाई झाली. कोणीही असे केले असते, तर असेच झाले असते. खूप काही तरी केल्याचा देखावा करण्याचा आव्हाडांना नाद. त्यातून असे प्रकार होतात.
आव्हाडांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यातील विवियन मॉलमध्ये 7 नोव्हेंबर रोजी आव्हाड हे 100 कार्यकर्त्यांसह घुसले. या वेळी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच त्यांना विरोध करणाऱ्या काही जणांना बेदम मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यासह बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज आव्हाडांना जामीन मिळाला आहे. थोड्याच वेळापूर्वी आव्हाड तुरुंगाबाहेर आलेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम