राज्यातून आणखी एक प्रकल्प बाहेर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ नोव्हेबर २०२२ राज्यातून गेल्या काही महिन्यापासून दोन प्रकल्प बाहेर गेले आहेत तर आजही एक प्रकल्प बाहेर गेल्याची बातमी समोर आली आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात मध्य प्रदेश सरकारने बाजी मारली आहे. मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाला तसे पत्रही केंद्र सरकारने पाठवल्याचे समजते.

वेदांता – फॉक्सकॉन, टाटा – एअरबस, बल्क ड्रग पार्क हे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा प्रकल्प गेल्याने पुन्हा एकदा राज्यात आरोप – प्रत्यारोपाला धार येणार आहे.

केंद्रातल्या भाजप सरकारने फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यात पाच वर्षांसाठी या झोनला तब्बल 400 कोटी रुपये मिळणार होते. याची अधिसूचना 13 एप्रिल 2022 रोजी काढली गेली. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची शेवटची तारीख ही 8 जून 2022 होती. या काळात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामुळे हा प्रकल्पही उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्राबाहेर केल्याचा खुलासा शिंदे – फडणवीस सरकारने केला आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्पासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि तमिळनाडू ही राज्ये स्पर्धेत होती. महाराष्ट्राकडून एमआडीसीने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम