…कारवाई होणारच ; जयंत पाटलांनी भरला आमदारांना दम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीतील काही आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन काही कृती केली आहे. सरकारमध्ये जाऊन त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याला पक्षाचा मुळीच पाठिंबा नव्हता, त्यामुळे त्यांनी पक्षाच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा दमच आमदारांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

मुंबईत ते पत्रकारांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादीत अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर पाटील यांनी पक्षाची भूमीका मांडली. पाटील म्हणाले की, चीफ व्हिप यांनीच पक्ष सोडल्याने त्यामुळे आता शरद पवार साहेब यांच्या आदेशानुसार जितेंद्र आव्हाड यांची विरोधीपक्षनेते पदी व मुख्य प्रतोतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा पक्षावर असे संकट येतात तेव्हा शरद पवार साहेब मोठ्या ताकदीने कामाला लागतात आणि अनेक सत्तांमध्ये बदल घडवून आणतात. त्यामुळे शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम चालू राहील. असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

ईडीने बोलावल्यावर काय दबाव आणला जातो त्यावर नंतर निवांत बोलेन, असे विधान जयंत पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे जे काही लोक आज सोडून गेले आहे. त्यांच्याबाबतीत देखील असेच काही घडले असेल, असे जयंत पाटील म्हणाले. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार, लोकप्रतिनिधी सद्याही शरद पवार यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आत्ता किती लोक दादांसोबत गेले, हे सांगता येत नाही. एक दोन दिवसात हे चित्र स्पष्ट होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पर्याय म्हणून अजित पवार यांना भाजपने सरकारमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यामुळे शिंदेंना यातून भविष्यात धोका आहे. जो शपथविधी झाला. त्यातीच बरेच सदस्यांनी शरद पवार साहेबांना भेटून आम्ही गोंधळलेलो आहे. या आजच्या कृतीला शरद पवार साहेबांचा अजिबात पाठिंबा नाही. त्यामुळे तालुका ते महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य 5 तारखेला बैठक बोलावली आहे. उपलब्ध असणार हॉल निश्चित केला आहे. चव्हाण सेक्टरच्या आसपासची जागेत कार्यकर्ते बसू शकतील. या बैठकीत शरद पवार आपली भूमिका अधिक स्पष्ट मांडतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम