पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची थेट कालव्यात उडी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये 73 वर्षीय आसिफ उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी एका पुलावर पोहोचतात आणि त्यानंतर त्याने तेथून कालव्यात उडी घेतात. त्यांनी बराच वेळ थंड पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असणारे आसिफ यांनी काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानला ‘आधीपासूनच डिफॉल्ट राष्ट्र’ म्हटले होते. त्यानंतर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही त्यांना फटकारले.

‘डेली पाकिस्तान’च्या वृत्तानुसार – संरक्षण मंत्री आसिफ त्यांच्या गावी सियालकोटला आले होते. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेणे हा त्यांचा उद्देश होता. रविवारी त्यांचा ताफा एका गावातून जात होता. त्यावेळी खूप उष्ण आणि दमट वातावरण होते. आसिफ यांनी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. यानंतर, शॉर्ट्स आणि टी-शर्ट परिधान केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम