‘या’ मुलीशी अभिनेता हृतिक रोशन करणार दुसरे लग्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  नेहमीच सोशल मिडीयावर हृतिक रोशन या ना त्या कारणाने चर्चेत येत असतो पण हा अभिनेता सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेला आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद हे दोघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक पार्ट्यांमध्येही हे सहभागी होतात.

काही दिवसांपूर्वीच हृतिक रोशन आणि सबा आझाद हे लंडनला फिरण्यासाठी गेले होते. यावेळी हृतिक रोशन याने सबा आझाद हिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सबा रस्त्याच्याकडेच्या बस स्टाॅपवर बसलेली दिसत होती. बऱ्याच लोकांना हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अजिबातच आवडत नाही. नेहमीच हृतिक रोशन आणि सबा आझाद हे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असतात. सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वीच हृतिक रोशन याच्यासोबतचा एका खास फोटो शेअर केला होता. सबा आझाद हिने शेअर केलेला हा फोटो पाहून अनेकांनी तिच्यावर टिका करत मुलगी आणि बापाची सुंदर जोडी म्हटले होते. विशेष म्हणजे सबा आझाद ही देखील यावेळी ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसली होती.
नुकताच आलेल्या एका रिपोर्टनुसार हृतिक रोशन आणि सबा आझाद हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबईमध्येच हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे लग्न पार पडणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.

काही दिवसांपूर्वीच हृतिक रोशन याने मुंबईमध्ये एक आलिशान घर देखील खरेदी केले आहे. लग्नानंतर हृतिक रोशन आणि सबा आझाद हे तिथेच शिफ्ट होणार आहेत. काही लोकांना हृतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी आवडते. आता चाहते हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. अनेकदा हृतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. सबा आझाद ही कायमच हृतिक रोशन यांच्या घरी जाते. इतकेच नाही तर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन त्याचे मुले आणि सबा आझाद हे विदेशात गेले होते. आता लग्नाची जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगितले जात असून हृतिक रोशन आणि सबा आझाद हे दोघेही खूप जास्त आनंदी असल्याची चर्चा रंगताना दिसत आहे. हृतिक रोशन याच्या वाढदिवसाला खास फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सबा दिसली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम