वय झाले पण तुम्ही गडी पाहिला नाही ; शरद पवार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून याचा शुभारंभ छगन भुजबळ यांच्या मतदार संघातून झाला असून यावेळी शरद पवारांनी जोरदार भाषण करीत अजित पवारांच्या गटावर टीकास्त्र सोडले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मी जे नाव दिले त्यांना येवल्यातील लोकांनी निवडून दिले. कारण मी कधीच नाव चूकलो नाही. पण एका नावाने घोटाळा झाला. त्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. कोणावर टीका न करता मी जनतेची माफी मागण्यासाठी आलो. माझा अंदाज फारसा चुकत नाही. परंतू येथे माझा अंदाज खरंच चुकला आहे. त्यामुळे मी यापुढे चुकणार नाही. असे आश्वासन शरद पवारांनी लोकांना दिला. तर आमदार मंत्री छगन भुजबळांना जोरदार टोला लगावला. ते येवला येथील सभेत बोलत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, माझा छगन भुजबळांविषयची अंदाज चुकला. यासाठी मी तुमची माफी मागण्यास आलोय, असे त्यांनी मतदारांना उद्देशून म्हटले. तर त्यांनी विविध विषयाला हात लावत जुन्या जाणत्या नेत्यांची आठवण करत नाशिककरांनी मला जोरदार साथ दिली आहे. असे सांगितले. संकटाच्या काळात येथील जनता पुन्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी उभी राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यक्तिगत बोलणे कधीच थांबत नसते. वय झाले ते खरे आहे पण गडी काय आहे अजून पाहिला कुठे, असे सांगत त्यांनी बंडखोरांना इशारा दिला. त्यामुळे उगं वयाबियाच्या भानगडीत पडू नका, वय आणि व्यक्तीगत भावना आम्हाला कोणी शिकवू नये. व्यक्तिगत हल्ले कधी अजिबात झालेले नाही. ते त्यांनी करू देखील नाही. या जनतेच्या विश्वासाला ज्या पद्धतीने तडा दिला. ते चुकीचे आहे.

यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, 10-12 दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला. वेगवेगळे आरोप केले. हे करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले. त्यांनी त्यांच्या भाषणात एक-दोन उदाहरणं सांगितली. भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी आज राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे काही आरोप केले असतील, त्यात भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा आणखी काही असेल, त्यावर त्यांनी कारवाई करावी. शरद पवार म्हणाले, माझं देशाच्या पंतप्रधानांना जाहीरपणे सांगणं आहे की, संपूर्ण देशाची सत्ता त्यांच्या हातात आहे. ती त्यांनी लावावी आणि आमच्यापैकी कोणी जर भ्रष्टाचारात सहभागी आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची असेल नसेल ती सगळी सत्ता वापरा, चौकशी करा, तपास करा आणि जो चुकीच्या रस्त्यावर गेलाय असं तुम्हाला वाटेल किंवा तुमचा तसा निष्कर्ष निघेल त्याला हवी ती शिक्षा द्या. त्यासाठी तुम्हाला आमचा पाठिंबा असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम