अभिनेता रणबीर घेणार अभिनयातून ब्रेक !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३

अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ चित्रपटातला लूक सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ची घोषणा झाल्यापासून जोरदार चर्चा होत आहे. सध्या रणबीरचे प्रेक्षकांच्या भेटीला एकामागून एक चित्रपट येताना दिसत आहेत. ‘ॲनिमल’ नंतर रणबीर कपूरचा ‘रामायण’ चित्रपटही येणार आहे. अशातच त्याने फिल्म इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक घेण्याची माहिती अभिनेत्याने स्वत: मुलाखतीतून दिली आहे.

नुकतंच रणबीर कपूरने ‘झूम’ वेबपोर्टलसोबत संवाद साधला होता. यावेळी रणबीरने त्याच्या रियल लाईफसह रिल लाईफबद्दल भाष्य केले आहे. लवकरच रणबीर अभिनयातून सहा महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. रणबीर लवकरच लेक राहासाठी अभिनयातून ब्रेक घेणार आहे. लग्नानंतर वर्षभरातच रणबीर- आलियाने लेक राहाचं धुमधडाक्यात स्वागत केलं. रणबीरने मुलाखतीमध्ये आपल्या लेकीसोबतचे बॉन्डिंग चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

दरम्यान रणबीर कपूरने मुलाखतीमध्ये सांगितले, “ मी ‘ॲनिमल’नंतर पुढील काही महिने नव्या सिनेमामध्ये दिसणार नाही. मी आता माझे सर्व लक्ष लेक राहाकडेच देणार आहे. राहाचा जन्म झाल्यानंतर मी शुटिंगमध्ये व्यग्र होतो, म्हणून मला तिच्यासोबत गुड टाईम स्पेंड करता आला नाही. त्यामुळे मुलीसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी मी लवकरच ६ महिन्यांसाठी ब्रेक घेणार आहे. राहा आता गुडघ्यावर रांगत असून, ती हळूहळू बोलायलाही लागली आहे. ती प्रचंड धमाल मस्ती करत असून ती आता ‘मा’ आणि ‘पा’ असे शब्दही बोलायला लागली आहे.” असं त्याने मुलाखतीमध्ये सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम