आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २५ ऑक्टोबर २०२३

राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु असतांना नुकतेच बीड येथील शहाजानपूर लोणी गावात एका २१ वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अशोक मते या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्या का करीत आहे असे उल्लेख करण्यात आला आहे.

स्वतःच्या शेतात अशोक मते याने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर त्यांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला होता. याविषयीची माहिती नातेवाईकांनी दिलीय. मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. खिशामध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तपासाचा भाग असल्याने चिठ्ठीमध्ये काय आहे? हे सांगू शकत नाही, असं पिंपळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश भारती यांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम