अभिनेता सनी देओल अडचणीत ; घर जप्तीची आली वेळ !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑगस्ट २०२३ | देशभर सध्या बॉलिवूड अभिनेता सनी देओल आपल्या ‘गदर-२’ चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आला असतांना या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली आहे. यंदाच्या वर्षात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘गदर 2’ हा दुसऱ्या क्रमांकावर येतो. सनी देओलला 2001 मध्ये ‘गदर’ या चित्रपटामुळे ओळख मिळाली. त्या आधी 90 च्या दशकात सनी देओलनं त्याच्या करिअरमध्ये प्रचंड स्ट्रगल केलं होतं. दरम्यान, त्याचे अनेक चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकले नाही. आता एकीकडे सनी देओलला ‘गदर 2’ या चित्रपटातून यश मिळालेले असताना त्याच्या सक्सेसचं सेलिब्रेशन करत असलेल्या सनी देओलला बॅंक ऑफ बडोदानं नोटीस बजावली असून त्याची मुंबईतील सगळ्यात महागडी प्रॉपर्टीची नीलामी होणार आहे.

बॅंक ऑफ बडोदानं सनी देओलच्या एका व्हिलाची नीलामी करणार असल्याची जाहिरात दिली. सनी देओलनं बॅंकेकडून एक मोठं लोन घेतलं होतं. या कर्जासाठी त्यानं मुंबईतील जुहू परिसरात असलेला त्याचा सनी व्हिला नावाचा बंगला गहाण ठेवला होता. त्याच्या बदल्यात सनी देओलला बॅंकेला जवळपास 56 कोटींची परतफेड करायची होती. पण त्यानं अजून दिलेले नाही. हे कर्ज आणि त्यावर असलेलं व्याज दोन्ही घेण्यासाठी बॅंकेनं या प्रॉपर्टीला विकण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेनं जाहिरातीत म्हटलं आहे की 25 सप्टेंबर रोजी सनी व्हिलाचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी प्रॉपर्टीची किंमत ही 51.43 कोटी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर या किंमतीवरून पुढे हा लिलाव होणार आहे.

सनी देओलच्या करिअरविषयी बोलायचे झाले तर ‘गदर 2’ च्या बॉक्स ऑफिसनं त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करत आहे. या चित्रपटानं फक्त 8 दिवसात 300 कोटींची कमाईचा आकडा पार केला आहे. तर 9 दिवसात चित्रपटानं 335 कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपट लवकरच 400 कोटींचा आकडा पार करेल यांची अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम