अभिनेत्री बच्चन यांची नात पडली ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ नोव्हेबर २०२३

बऱ्याच दिवसांपासून अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या अफवांमध्ये आणखीनच भर पडली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा हे लव्हबर्ड्स डिनर डेटवर जाताना दिसलं. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

अलीकडेच, नव्या आणि सिद्धांत दिग्दर्शक शकुन बत्रा आणि नव्याची आई श्वेता बच्चन यांच्यासोबत डिनरवरुन बाहेर पडताना दिसले. व्हिडिओमध्ये, श्वेता बच्चन पहिल्यांदा ईव्हेंट वेन्यूहून बाहेर पडली यावेळी ती तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारताना दिसतेय. यानंतर नव्या नंदा, सिद्धांत चतुर्वेदी आणि शकुन बत्रा दिसतायेत. नव्या आणि सिद्धांत बाहेर पडताना गप्पा मारताना दिसतायेत. मात्र सिद्धांत मध्येच थांबतो, तर नव्या आणि बत्रा सुरू गप्पा मारतात. यानंतर सिद्धांतही नव्या आणि बत्रासोबत त्याच गाडीतून निघून जातो. या नाईट आउट दरम्यान, नव्या नंदा स्लिट, ओपन हेअरस्टाईल आणि हँडबॅगसह नेव्ही ब्लू मिडी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तर सिद्धांत काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम