मराठा आरक्षणावर सर्वच पक्षांचे एकमत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ नोव्हेबर २०२३

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असतांना दिवसेंदिवस हा मुदा चिघळत चालला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिंदे सरकारने आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल 2 तास चालली. या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वच पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली. त्यामुळे सरकारने जालन्याच्या आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना तातडीने आपले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत आहे. याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते व त्यासंदर्भात राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. कायदेशीर कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्र, त्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहे, हे पण लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून यामुळे आंदोलनाची बदनामी होत आहे. या घटनांबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हाती घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन सर्वपक्षीयांनी केले व तसा ठरावही मंजूर करण्यात आला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम