अभिनेत्री कियाराला व्हायचे होते लग्नाआधी ‘आई’

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ जुलै २०२३ ।  देशातील अनेक अभिनेत्री आहे ज्यांना लग्ना आधी आई व्हायचे असते यावर एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असलेल्या या अभिनेत्रींने हा खुलासा केल्याने सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया याबाबत उमटू लागल्या आहेत. अभिनेत्री कियारा अडवाणीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात कियारासोबत अभिनेता कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका होती. मात्र आता कियारा तिच्या चित्रपटामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

7 फेब्रुवारीला कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर लग्नगाठ बांधली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिच्या गरोदरपणाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता तिचा एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने गरोदरपणाबद्दल एक विधान केले आहे. ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान झालेल्या एका मुलाखतीत कियारा म्हणते की, “मला गरोदर राहायचे आहे. जेणेकरून मी जे पाहिजे ते खाऊ शकेल. होणारं बाळ मुलगा आहे की मुलगी याने मला काही फरक पडत नाही. फक्त ते निरोगी असले पाहिजे.” यावेळी तिने गरोदर राहण्याची इच्छा व्यक्त करत त्यामागचे कारणही सांगितले. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यानचा कियारा आडवाणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये कियाराचे बेबी बंप दिसत असल्याने ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या फोटोमध्ये कियाराने केसरी रंगाच्या ब्रालेटसोबत मॅचिंग ब्लेझर आणि पॅन्ट परिधान केलेली दिसत आहे. पण कियाराच्या बेबी बंपने चाहत्यांचं लक्ष वेधलं होते. मात्र प्रेग्नंट असल्याच्या बातमीबाबत कियाराने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचे राजस्थानमध्ये 7 फेब्रुवारी 2023 रोजी विवाह झाला. त्यानंतर आता तिच्या गरोदर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर येत्या 31 जुलै रोजी कियाराचा वाढदिवस असल्याने दोघे एकत्र परदेशात गेले आहेत. 27 जुलैला रात्री मुंबई विमानतळावर कियारा आणि सिद्धार्थ स्पॉट झाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम