आमदार नाराज ; लवकरच होणार मंत्रिमंडळ विस्तार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ जुलै २०२३ | राज्यात ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेवून मोठ बंड करीत भाजपशी हातमीळवणी करीत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीचे समर्थक आमदार सोबत घेते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

दरम्यान शिंदे गट आणि भाजपचे आमदार मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत असतााना अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ खात्याची जबाबदारी देखील देण्यात आली.

मात्र, यानंतर एकनाथ शिंदे गटात तसेच भाजपच्या गोटात देखील मंत्रिपदासाठी रांगेत असलेले काही आमदार नाराज झाल्याच्या चर्चा समोर आल्या. दरम्यान आता या सर्व नाराज आमदारांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लवकरच राज्यात पुन्हा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा दुसरा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवशन सुरू आहे. हे अधिवेशन संपताच मंत्री मंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात १५ ॲागस्टच्या आत नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होऊन जिल्ह्यांना नवीन पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम