अभिनेत्री रुबिना दिलैक होणार आई !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३

बिग बॉस-14’ची विजेती व ‘छोटी बहू’, ‘शक्ती’ या मालिकेतील अभिनेत्री रुबिना दिलैक हि सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती चाहत्यांशी आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सप्टेंबर महिन्यात तिने बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे फोटो चाहत्यांच्याही चांगलेच पसंतीस पडले होते.

‘छोटी बहू’, ‘शक्ती’ या मालिकेतील अभिनेत्री रुबिना दिलैक लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने ही माहिती चाहत्यांना दिली होती. नुकतेच तिने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. पांढऱ्या रंगाच्या हटके लूकमध्ये तिने केलेले हे फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे. रुबिनाच्या मॅटर्निटी फोटोशूटची थीम व्हाईट आहे. या फोटोशूट साठी रुबिनाने आणि पती अभिनव शुक्ला दोघांनी पांढऱ्या शुभ्र रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अनिभवने पांढरा टी-शर्ट, त्यावर पांढरा कोट आणि पँट घातलेली दिसत आहे. या लूकमध्ये दोघेही सुंदर दिसत आहे. रुबिनाने हे फोटो शेअर करत ‘माझ्या आयुष्यातील चमत्कार ज्याचं मी शब्दात वर्णनही करु शकत नाही’ असं कॅप्शन दिलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम