दुचाकीचा वाद अन तरुणाचा खून !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ नोव्हेबर २०२३

चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे पोलीस स्थानकाच्या हद्दीत दुचाकी दुरुस्तीच्या वादातून गॅरेज चालकाचा एकाने खून केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना बहाळ रथाचे या गावात घडली असून या प्रकरणी खून करणाऱ्या दुचाकीधारकांविरोधात मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बहाळ कसबे येथील रहिवासी महेश संतोष बोरसे याची दुचाकी दुरुस्तीचे शिवशक्ती मोटार नावाचे गॅरेज असून या गॅरेजवर ज्ञानेश्वर निंबा मासरे (पठाण) याने मोटार सायकल दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्याच्या दुचाकी पुन्हा खराब झाल्याने त्यामुळे तो दि.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गॅरेजवर पुन्हा आला. माझी दुचाकी आत्ताच्या आता दुरुस्त करुन दे असा तगादा ज्ञानेश्वर मासरे (पठाण) याने महेश बोरसे याच्याकडे लावला. माझे काम सुरु आहे, थोडे थांब तुझी मोटार सायकल दुरुस्त करुन देतो असे महेश बोरसे याने ज्ञानेश्वर मासरे याला म्हटले.

मात्र ज्ञानेश्वर मासरे (पठाण) याला धीर नसल्यामुळे त्याने वाद घालून महेश बोरसे यास जमीनीवर आपटून जीवे ठार केले. वाद सुरु असतांना महेश बोरसे याचे वडील वाद सोडवण्यास आले होते. त्यांना देखील ज्ञानेश्वर याने शिवीगाळ व दमदाटी केली होती. या घटनेप्रकरणी मयत महेश बोरसे याचे वडील संतोष तुकाराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मेहुणबारे पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. विष्णू आव्हाड करत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम