अड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे गुणवंतांचा गौरव करत ध्वजारोहण

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी) अड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे १० व १२ तील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करत व विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत संस्था अध्यक्ष सौ अड ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष अड ललिता पाटील यांनी विद्यार्थी पालक व शिक्षक वर्ग यांना पुढील काळात देशाचे व शाळेचे भवितव्य कसे पुढे जाईल याचे मोलाचे मार्गदर्शन केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत कार्यक्रमाची शोभा वाढवली देशभक्तीपर गीत , नृत्य , भारता पुढील येणाऱ्या आव्हानां बाबत व्याख्याने व विविध सांस्कृतिक देखावे दाखवत कार्यक्रम सुशोभित केला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रा श्याम पाटील संचालक पराग पाटील प्राचार्य विकास चौधरी सर प्रा प्रकाश महाजन सर डॉ निखिल बहुगुणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीष गोसावी प्रा.प्राजक्ता शिंदे सचिन शिंदे डॉ प्रतिभा मराठे व सर्व पालक उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा अश्विनी चौधरी यांनी केले व आभार मंगला चौधरी मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक केदार देशमुख व सर्व शिक्षक वर्ग इतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम