अमळनेर येथे निघाली ईतिहासिक रॅली सात हजार विद्यार्थिनी सामूहिक राष्ट्रगित म्हणून एका नवा इतिहास घडवला

बातमी शेअर करा...

अमळनेरर(आबिद शेख) महसूल व पालिका प्रशासनातर्फे १५ ऑगस्ट रोजी १ किमी तिरंगा रॅली काढण्यात आली तसेच सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून आणखी एक नवा इतिहास घडवण्यात आला.
१५ रोजी सकाळी शासकीय ध्वजारोहण झाल्यानन्तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आमदार अनिल पाटील ,माजी आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार स्मिता वाघ ,डॉ अनिल शिंदे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे , डी वाय एस पी राकेश जाधव ,तहसीलदार मिलिंद वाघ ,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , गटविकास अधिकारी विशाल शिंदे , गटशिक्षणाधिकारी एस पी चव्हाण ,बजरंग अग्रवाल यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. मंगलमूर्ती चौक ,रेल्वे स्टेशन चौक ,स्वामीनारायण मंदिर , नगरपालिका ,सुभाष चौक ,राणी लक्ष्मीबाई चौक , दगडी दरवाजा , तिरंगा चौक , पाचपावली मंदिर , बसस्थानक , महाराणा प्रताप चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापर्यन्त रॅली काढण्यात आली. साने गुुजींच्या पुतळ्याला खानदेश शिक्षण मंडळलाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी माल्यार्पन केले. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला मा नगराध्यक्ष सुभाष अण्णा चौ धरी यानी मल्यार्पन केले.
रॅलीच्या सुरुवातीला भारत मातेच्या रुपात माजी सॅनिकांची गाडी होती. त्याचे सारथ्य धनराज पाटील यांनी केले. त्यांनतर ७५ स्वातंत्र्य सैनिक ,विविध क्रांतिकारक यांच्या वेशात सानेगुरुजी शाळेचे विदयार्थी , देशाच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे मुंदडा ग्लोबल शाळेचे विद्यार्थी , त्यानंतर प्रताप महाविद्यालय , जि एस हायस्कूल , स्वामी विवेकानंद स्कूल ,डी आर कन्याशाळा ,सावित्रीबाई फुले कन्याशाळा , अल्फैज उर्दू हायस्कूल,जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय, लोकमान्य शाळा , यांच्यासह विविध शाळांनी तिरंगा पेलून धरला होता.
रॅलीत ठिकठिकाणी तिरंग्यावर तसेच भारत माता व प्रतिकात्मक क्रांती वीर ,स्वातंत्र्यसैनिक यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रॅली संपल्यानन्तर सुमारे साडे सात हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हटले.
रॅलीत उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड ,नायब तहसीलदार नवनाथ लांडगे , खान्देश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन नीरज अग्रवाल ,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी ,अर्बन बँकेचे माजी चेअरमन पंकज मुंदडा, प्रकाश मुंदडा ,मंगळ ग्रह मंदिराचे अद्यक्ष दिगंबर महाले ,पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , पोलीस उपनिरीक्षक विकास , शिरोडे , उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, गोपनीय अमलदार डॉ.शरदपाटील,अभियंता अमोल भामरे ,अभियंता दिगंबर वाघ , अभियंता सत्येम पाटील संजय चौधरी यांच्यासह समाजातील सर्व क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.
बजरंग सुपर मार्केट तर्फे विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. रॅली यशस्वी करण्यासाठी खान्देश रक्षक संघटना , आजी माजी सैनिक ,एनसीसी कॅडेट , पत्रकार संघटना ,तालुका क्रीडा संघटना , तलाठी संघटना ,रोटरी क्लब ,लायन्स क्लब ,नगरपालिका , पोलीस ,होमगार्ड यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

BJP add
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम