अड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथील विद्यार्थ्यांचे १००टक्के टक्के यश संपादन
अमळनेर(प्रतिनिधी) अड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल,अमळनेर च्या दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा केंद्रीय शिक्षण बोर्ड दिल्ली
(सी बी एस इ) दिल्लीच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेत घवघवीत यश संपादन करत उज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.
बारावीत प्रथम क्रमांक पटकावत यश महाजन ९४.२० पार्थ पंत ८८.८० पियुष चंद्रे ८७ प्रथमेश कौजलगी८४.२० करिष्मा पाटील ८२.८० हे विद्यार्थी प्रथम पाच आलेले आहेत.
दहावीत रुद्रेश गांगुर्डे९७.४० भक्ती मेटकर ९१.४० वसुंधरा शिंदे ८८ स्नेहल पाटील८४.६० भूमिका डिंकराई ८०.८० हे विद्यार्थी प्रथम पाच आलेले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्ष अड.ललिता पाटील,सचिव प्रा.श्याम पाटील ,संचालक पराग पाटील,देवश्री पाटील व प्राचार्य विकास चौधरी सर तसेच सर्व शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील एक नावाजलेली व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी सीबीएसई दिल्ली मार्फत मान्यताप्राप्त असलेली अड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल ही नावलौकिक मिळवलेली शाळा आहे हे विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले. शाळेतील सर्व आधुनिक सुविधा व गुरुजनांचे मौलिक मार्गदर्शन या आधारावर विद्यार्थ्यांनी १००टक्के यश संपादन करत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम