सृजनशीलतेमुळे जगणं सुंदर होत – गोविंदवार रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे व्याख्यानाचे आयोजन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जुलै २०२२ । जळगाव येथे सृजनशीलतेमुळे जगणं सुंदर होतं, जिथे केवळ उपभोग आहे तिथे दुःख आहे आणि जिथे निर्माण, निर्मिती आहे तिथे आनंद आहे असे वक्ते मनोज गोविंदवार यांनी प्रतिपादन केले.

रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रलतर्फे गणपती नगरातील रोटरी हॉल मध्ये “आयुष्याचं बॅलन्सशीट” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष विपुल पारेख, मानद सचिव रविंद्र वाणी यांची उपस्थिती होती.

व्याख्यानात बोलतांना गोविंदवार यांनी आपण पैश्यांचे बॅलन्सशीट करतो पण आयुष्याचे करत नाही. जगणं किंवा आयुष्य कश्यासाठी हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे असे सांगून श्वास घेणे, सोडणे हे सुद्धा डेबीट, क्रेडीट आहे. आयुष्य हे बदल करण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी आहे असे त्यांनी सांगितले.

आयुष्याचं बॅलन्सशीट करतांना भिती, द्वेष, अपराधीपणाची भावना, न्युनगंड या चार अडथळ्यांचा सामना करावा लागतो असे गोविंदवार यांनी सांगून आपल्या मर्यादा, क्षमता अोळखून या चार गोष्टींवर मात केल्यास जीवनात खूप मोठा बदल होऊ शकतो असे सांगितले. शेवटी आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे शांत डोकं आणि प्रसन्न मन असा संदेश त्यांनी दिला.

डॉ. विद्या चौधरी यांनी पानशेवडी या आदिवासी पाड्यावर रोटरी सेंट्रलतर्फे केलेल्या फळझाड लागवडीबाबत अनुभव कथन केले. कल्पेश दोशी यांनी आगामी कार्यक्रमाची माहिती दिली. परिचय दिनेश थोरात यांनी करुन दिला. क्लबमधील डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स महेंद्र रायसोनी, डॉ. अपर्णा भट-कासार, कल्पेश दोशी, डॉ. अशोक पाध्ये, संतोष अग्रवाल, डॉ. अंजुम अमरेलीवाला, मिलन मेहता, शामकांत वाणी, विष्णू भंगाळे आदिंना अतिथींच्या हस्ते डिस्ट्रिक्ट डिरेक्टरीचे वितरण करण्यात आले.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम