‘आदिपुरुष’ प्रदर्शित तर टीका करणाऱ्या तरुणाला मारहाण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जून २०२३ ।  देशभरात प्रभास स्टार ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काही चाहते त्याचे कौतुक करत आहेत, तर अनेक युझर्स जोरदार ट्रोल करत आहेत. दरम्यान, एक व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यात एका तरुणाला ‘आदिपुरुष’वर टीका केल्याने मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ हैदराबादमधील प्रसाद थिएटरच्या बाहेरचा असून चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणाला जमावाने मारहाण केली. या तरुणाची एकच चूक होती की, त्याने चित्रपटातील पात्रांची तुलना व्हिडिओ गेम्समध्ये दाखविलेल्या राक्षसांशी केली. चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या या तरुणाकडून मीडियाने चित्रपटाचा रिव्ह्यू मागितला. तरुण म्हणाला, ‘निर्मात्यांनी चित्रपटात प्लेस्टेशन गेममधील सर्व राक्षस ठेवले आहेत. हनुमान, बॅकग्राउंड स्कोअर आणि काही थ्रीडी शॉट्स वगळता या चित्रपटात काहीच नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम