“आदिपुरुष असेल परपुरुष असेल…” पवारांनी उपस्थिती केली शंका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जून २०२३ ।  देशात शुक्रवारी ‘आदिपुरुष’ चित्रपटत प्रदर्शित झाल्यानंतर सगळीकडे चर्चा सुरु आहे. रामायणावर आधारित या चित्रपटामध्ये मूळ कथेचे तोडमोड करण्यात आल्यापासून ते पात्र ज्यापद्धतीने चित्रपटात दाखवली आहेत यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षापासून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या चित्रपटावर टीका केली आहे. मात्र प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटासंदर्भातील वादावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये प्रतिक्रिया नोंदवताना वेगळीच शंका व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांना ‘आदिपुरुष’ चित्रपटासंदर्भात वाद सुरु असल्याचा उल्लेख करत पत्रकारांनी प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी त्यांच्या खास शैलीमध्ये, “अरे बाबा, असे चित्रपट निघाल्यानंतर मग तो चित्रपट आदिपुरुष असेल परपुरुष असेल किंवा आणखीन कसला पुरुष असेल तरी या असल्या वादाची कशाला चर्चा करता?” असा प्रतिप्रश्न पत्रकारांनाच केला. अजित पवार यांनी पुढे बोलताना शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या वेळी झालेला वाद आणि दीपिका पादुकोणच्या ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळेसही असाच वाद झाल्याची आठवण पत्रकारांना करुन दिली.

अजित पवार यांनी ‘पठाण’ आणि ‘पद्मावती’चा उल्लेख करत असे वाद निर्माण करण्यासंदर्भातील वेगळीच शंका बोलून दाखवली. “हे असं ‘पठाण’च्या वेळेलाही झालं होतं. त्याआधी ‘पद्मावत’ की ‘पद्मावती’ त्याबद्दलही झालं होतं. मला असा वाटतं की हे चित्रपट मोठ्या प्रमाणात, देशपातळीवर चालण्या करता हे केलं जातं. अशावेळेस त्रयस्त काय विचार करतो की असे एवढी मोठी बातमी आली. असं काय आहे या चित्रपटामध्ये असा विचार करुन चित्रपट पहायला जातोय. हेच त्यामागील गमक आहे की काय याचाही शोध घेतला पाहिजे,” असं अजित पवार ‘आदिपुरुष’संदर्भातील वादावर भाष्य करताना म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम