राज्यासाठी मान्सूनची वाटचाल ; हवामान खात्याने दिला अंदाज !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जून २०२३ ।  देशातील गुजरातनंतर राजस्थानमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ मोठा हाहाकार माजविला आहे. चक्रीवादळामुळे देशातील काही भागांत मुसळधार पाऊस सुरु आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल थांबली आहे. चक्रीवादळाने मान्सूनवर परिणाम केला आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. आता कोकणातून मान्सूनची वाटचाल सुरु होणार आहे. लवकरच कोकणातून मुंबईत मान्सूनचे आगमन होणार आहे. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलीय.

मुंबईत मान्सून येत्या ७२ तासांमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगतले की, अरबी समुद्रात मान्सून सक्रीय होण्याच्या द्दष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे रत्नागिरीत मान्सूचा थांबलेला प्रवास सुरु होणार आहे. येत्या ७२ तासांत तो मुंबईत दाखल होणार आहे. दक्षिणेत पाऊस सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. तसेच येत्या आठवड्यात उत्तर-पश्चिम भारत, मध्य, पूर्व आणि ईशान्य भारताच्या मैदानी भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरवर्षी केरळमध्ये १ जून रोजी मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर कोकणात ८ जूनपर्यंत पाऊस दाखल होतो. कोकणातून मुंबईसह महाराष्ट्रात दोन, तीन दिवसांत मान्सून पोहचतो. परंतु यंदा मान्सून कोकणात आला तरी बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याचा प्रवास थांबला आहे. कोकणात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही थांबल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. परंतु आता मान्सून मुंबईनंतर दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांचाही आशा पल्लवित होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम