आदिपुरुषच्या लेखकाच्या जीवाला धोका ; सुरक्षेची होतेय मागणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  देशात नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर अनेकाकडून टीका टिपण्णी होत आहे. तर काही भागात चित्रपटाला मोठा विरोध देखील पहायला मिळत आहे. या चित्रपटात मनोज मुंतशीर यांनी हे संवाद लिहिलेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंतशीर यांनी पोलिसांकडे विद्यमान वादामुळे आपल्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या सुरक्षेच्या विनंतीवर मुंबई पोलिस योग्य तो निर्णय घेणार आहेत.

प्रभास, क्रिती सेनन व सैफ अली खान अभिनित आदिपुरुष चित्रपट गत शुक्रवारी म्हणजे 16 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. पण त्यातील काही संवादांविरोधात देशभर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. रामायणावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत.

आदिपुरुष चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे. त्याच्या निर्मात्यांवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. संत समाजच नव्हे तर केंद्रातील सत्ताधारी भाजपसह विविध पक्षांच्या नेत्यांनीही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनेही यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, देशात कुणालाही कुणाच्याही भावना दुखावण्याची परवानगी नाही.

आदिपुरुष चित्रपटातील संवादांवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात तिखट होत आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी ते बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मनोज मुंतशीर याविषयी बोलताना म्हणाले, मुलांना या चित्रपटाशी जोडण्यासाठी या चित्रपटाचे असे संवाद लिहिण्यात आले. चित्रपटातील केवळ 5 डायलॉग्सवर आक्षेप आहेत. एक चित्रपट 4000 हजार संवादांनी तयार होतो. प्रेक्षकांना 5 डायलॉग आवडले नाहीत, याचा अर्थ 3995 डायलॉग आवडलेत. 4000 पैकी 5 बदलल्याने काहीही होणार नाही. ज्या संवादावर आक्षेप आहे, ज्याचा जनतेला त्रास होत आहे, ते संवाद बदलले जातील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम